You are currently viewing झाराप येथे दुचाकीवरून पडल्यामुळे पेंडूर येथील महिला गंभीर जखमी…

झाराप येथे दुचाकीवरून पडल्यामुळे पेंडूर येथील महिला गंभीर जखमी…

झाराप येथे दुचाकीवरून पडल्यामुळे पेंडूर येथील महिला गंभीर जखमी…

सावंतवाडी

खड्ड्यात दुचाकी आदळल्यामुळे झालेल्या अपघातात पेंडूर तालुका मालवण येथील महिला गंभीर जखमी झाली. जयश्री भागोजी तेंडुलकर (वय ४०) असे तिचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी झाराप झिरो पॉईंट येथे घडला. तिला सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. त्या आपल्या पतीसोबत मालवण हून मातोंड येथे गावी जात होत्या. यावेळी हा अपघात घडला. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा