सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जनता विद्यालयाची बारावीतील विद्यार्थिनी सायली सतीश धुरी (वय वर्षे १७ रा. मिरिश्तेवाडी तळवडे) ही मैत्रिणीसोबत कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक वडाची झाड अंगावर पडून तिच्या मृत्यू झाला. तर तिच्या दोन मैत्रिणी या थोडक्यात बचावल्या. ही घटना आज दुपारी एकच्या दरम्यान तळवडे मिरिश्तेवाडी येथे घडली. घटनेनंतर तिला तात्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाले.
ही घटना घडतच स्थानिक ग्रामस्थांनी लगेचच धावाधाव करत तिला सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात तळवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.