You are currently viewing कुडाळला २७, २८ रोजी बॅडमिंटन स्पर्धा..

कुडाळला २७, २८ रोजी बॅडमिंटन स्पर्धा..

कुडाळला २७, २८ रोजी बॅडमिंटन स्पर्धा..

कुडाळ

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय इन असोसिएशन व जयेश धुरी बॅडमिंटन अॅकॅडमी आणि सिंधुदुर्ग बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय इनडोअर बॅडमिंटन स्टेडियम येथे बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ११, १३, १७, २१ वर्षांखालील वयोगट व खुल्या गटात आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांना चषक व बॅडमिंटन किट देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी २६ जुलैपर्यंत तुषार शेट्टी, मोबा-९९६७७९७४६२ यांच्याकडे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा