You are currently viewing संजय गांधी योजना लाभार्थ्यांनी २५ जुलैपर्यंत हयात दाखले द्यावेत

संजय गांधी योजना लाभार्थ्यांनी २५ जुलैपर्यंत हयात दाखले द्यावेत

*संजय गांधी योजना लाभार्थ्यांनी २५ जुलैपर्यंत हयात दाखले द्यावेत !*

*कणकवली*

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण यापुढे डीबीटी पद्धतीने होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभ थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याची माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याचे काम येथील तहसील कार्यालयात सुरू आहे. तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही हयात प्रमाणपत्र तहसील कायार्लयात् सादर केलेले नाही, त्यांनी तात्काळ तलाठ्यांकडून हयात प्रमाणपत्र घेऊन त्यावर बँक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व त्यासोबत आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, अपंग असल्यास प्रमाणपत्र झेरॉक्स जोडून तहसील कार्यालयात २५ जुलैपर्यंत सादर करायचे आहे.
आधार क्रमांक संलग्न करा ! प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा. वेळेत हयात दाखले सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा