श्री स्वामी समर्थ मठ घावनळे कासमळा येथे रक्तदान शिबिर सर्व भक्तगण,रक्तदात्यांच्या सहकार्याने संपन्न..
कुडाळ
🕉️श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता मंडळ (परिवार) घावनळे,कासमळा, तालुका कुडाळ श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवर्य गुरुमाऊली आढावा ५१वा वाढदिवस अभिष्टचिंतनाचा सोहळा सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानिमित्त परिवारातर्फे पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार १७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांवर अभिषेक व पादुका पूजन व पादुका दर्शन उपस्थित भक्तगणांनी घेतले. त्यानंतर सकाळी ११:३०वाजता स्वामींची महाआरती करण्यात आली. दुपारी १२:०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा गुरुवर्य माऊलींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत व गुरुमाऊलींचे पाद्यपुजन व सेवेकऱ्यांकडून औक्षण करून गुरुवर्य माऊलींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दुपारी १:०० वाजता महाप्रसादाचे आयोजन होते.सायंकाळी ४:०० वाजता श्री स्वामी समर्थ जगदमाता परिवार यांचे नामस्मरण व तद्द्नंतर सायंकाळी ५:०० वाजता श्री देव वेतोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ मायनेवाडी-कोचरा यांचे वारकरी भजन व सायंकाळी ७:०० वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी बुवा श्री आशिष सडेकर यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
रात्रौ ८:०० वाजता महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन ह्या यादिवशी संपूर्ण दिवस खुले होते.
सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता 🕉️श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परिवार घावनळे कासमळा यांच्या कडून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या सहयोगी संस्थेच्या सहकार्याने 🕉️ श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ जगदमाता मंडळ परिवार, श्री स्वामी समर्थ मठ घावनळे कासमळा येथे गुरुवार दिनांक १८ जुलै २०२४ सकाळी ९.०० वाजता आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिर व डोळे व आरोग्य तपासणी शिबीर ह्या सोहळ्यास सर्व भक्तगणांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या ईश्वराधिष्ठित कार्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात मोलाचे सहकार्य केले. सदर रक्तदान शिबिरासाठी ५२ रक्तदात्यांनी आपले बहुमूल्य असे रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता मंडळ घावनळे कासमळा यांच्याकडून पुष्प,श्रीफळ,विभूती व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला तर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य सेवक,परिचारिका,डॉक्टर व SSPM रक्तपेढी चे कर्मचारी व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या उपस्थित सर्व सदस्यांचे मंडळातर्फे पुष्प व श्रीफळ देऊन गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आभार व्यक्त करण्यात आले. श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन उपस्थित सर्व भक्तगणांनी घेतले.
मठाचे भक्तगण श्री.अमित चव्हाण यांनी सूत्रसंचालन व श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष श्री. दादा गवस व गुरुवर्य गुरुमाऊली तसेच सर्व सेवेकरी यांनी सर्व कार्यक्रमांचे उत्तम नियोजन करून सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*