*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”वारकरी वीणा”*
वीणा संगीतातील सुंदर वाद्य आहे प्राचीन
सरस्वतीची वीणा आहे वेद पुराणा पासूनIIधृII
वीणा प्रतिक आहे शांती संगीत ज्ञान सृजन
ब्रह्म वाद्य नारद घेऊन फिरती त्रिभुवनांत
भरत मुनींनी बदल केला नाट्यशास्त्र प्रवीणII1II
वीणा पाच तारांचे आहे सुरेल सात्विक वाद्य
तानपुरा आहे राजस तंतु वाद्य विख्यात
खुंट्या पिळता येतो अलवार झंकार नादII2II
वारीमध्ये असती पताकाधारी पुढ्यांत
भालदार टाळकरी मृदंग चालती मार्गात
विणेकरी सुचवेल त्याने म्हणायचे पदII3II
वारकरी गाती अभंग गौळण भारुड धृपद
विणेकरी सह चालती स्त्रिया तुळस घेऊन
सख्या चालती जळ कलश लेऊन आनंदानंII4II
गोपाळकाला उरकून विणेकरी परततात
आळंदीस आल्यावर होते नगर प्रदक्षिणा
पाखळणी होऊन माऊली होते स्थानापन्नII5II
वारकरी सुखरूप येतात आपल्या गावांत
वीणा पूर्ववत ठेवून निरोप घेती कृतज्ञतेनं
विणेकऱ्यांच्या गळ्यातील वीणा होते उतरवणंII6II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.