*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य*
*गुरू*
गुरू
मार्ग दाखवतो
चुकले असता योग्य
समज देऊन सन्मार्गाला नेतो…
*गुरू*
निसर्गात शोधावा
निस्वार्थी भावनेने देणं
महान बोध मानवाने घ्यावा…
*गुरू*
ईश्वर ,मातापिता
शिक्षक वंदनीय थोर
निर्मळ ठेवती विचार सरिता…
*गुरू*
लहान थोरात
घेता यावेत गुण
शोधावा प्रत्येक स्थूलसुक्ष्म रुपात….
*गुरू*
ज्ञान देतो
चेतना मिळे तनामनाला
जीवन उज्ज्वल प्रकाशाने उजळतो….
अरुणा दुद्दलवार@✍️