मुंबई –
झाडांफळाची मूळे दिसून येतात पण अहंकारचे मूळ दिसत नाही. खरंतर भौतिक आणि लौकिक जीवन म्हणजे हा संसार आहे. आपलं जन्म मरण चुकविणे म्हणजे भक्ती होय , व्यवहार होतो त्याला प्रपंच म्हणतात. वातावरण बदलत असते ते बरोबर असून आपले मनाशी एकाग्र राहून आपल्या भूमिकेवर ठाम रहा! मन बदल्यांचे नाही. म्हणूनचं गुरू हा प्रत्येकाला करावा लागतो. परमेश्वराची बरीच नांवे आहेत पण भक्ती निष्काम असावी असे समर्थ सद्गुरु श्री गुरुदास माऊली यांनी समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरूपौर्णिमा उत्सवात गुरूपौर्णिमेचे महत्त्व पटवून सांगताना प्रतिपादन केले. प्रारंभी प.पू. राऊळ महाराज महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक , श्री गुरुदास माऊलींची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी बुवा संगमेशकर, आणि बुवा नंदेश यांच्या भारदस्त भजनाच्या सुस्वर सुरांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्याला वादक वसंत घडशी यांनी तबला साथ केली. त्याला चकी साथ तन्वीर आंगणे यांनी दिली. गुरूचरित्र व दासबोध यावर बोलताना प. पू.गुरूदास माऊली पुढे म्हणाले, समाजाला संतांनी जे दिले आपण त्यांची किर्ती वाढविली पाहिजे. नेहमी परोपकाऱ्यासाठी झटा ती सुद्धा फळांची अपेक्षा आसक्ती न धरता कर्तव्य म्हणून माया ईश्वराला देवून टाका असे नमूद केले.महाआरती , महाप्रसाद यांचा भक्तांनी लाभ घेतला. प. पू. माऊलीच्या दर्शन सोहळ्याने सांगता झाली. पुन्हा एकदा एकमेकांशी संवाद साधूया या वचनांनी भक्त मार्गस्थ झाले. श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.