You are currently viewing डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवतांना शिष्टमंडळ भेटले

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवतांना शिष्टमंडळ भेटले

अमरावती दि.22 :

शिक्षण महर्षी कृषी महर्षी व अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न उपाधीने गौरविण्यात यावे ही मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे .या मागणीसाठी हे वर्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे असल्यामुळे या मागणीला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .या संदर्भात तयार झालेल्या शिष्टमंडळाने नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये मा. कुलगुरू डॉ. प्रकाश घवघवे कृषी विभागाचे माजी उपसंचालक डॉ.मंगेश देशमुख सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेशराव कुकडे डॉ. दिगंबर आळशी प्रा. भगवान कोलते डॉ. सुरेश खोंडे भारतीय कृषक समाजाचे डॉ. सुभाष नलांगे वामनराव उमरे मधुकर बरडे व डॉ. दिघेकर यांचा समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांना दिलेल्या या निवेदनामध्ये शिक्षण महर्षी व कृषी महश्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने 125 रुपयांचे नाणे काढल्याबद्दल भारत सरकारचे या शिष्टमंडळाने अभिनंदन केले आहे. तसेच हे वर्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीच्या असल्यामुळे त्यांना त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना यावर्षी भारतरत्न ही उपाधी देऊन गौरव प्रदान करण्यात यावा असेही या निवेदनात नमूद केले आहे .डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी प्राप्त व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रतिसाद प्राप्त होत आहे. या संदर्भात दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य यांची एक सभा आयोजित केली आहे. या सभेत हा ठराव सर्वानुमते मांडण्यात येणार आहे. त्यानंतर या खासदारांचे एक शिष्टमंडळ भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री श्री अमित शहा यांना भेटून डॉ.पंजाबराव देशमुख यांचा भारतरत्न म्हणून उपाधी देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे .अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख भारतरत्न समितीचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. व्ही टी इंगोले व संयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

प्रकाशनार्थ – प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा