गुरूपौर्णिमेला संगीत सेवा ; वेंगुर्लेत सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ
वेंगुर्ला :
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या गायकांनी श्री पार्सेकर दत्त मंदिर (कैवल्याश्रम मंदिर) येथे दत्तगुरुंचरणी गायन सेवा अर्पण केली. अभंग, भक्तीगीतांच्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. याचवेळी याच देवालयाच्या माडीवर ”श्री सद्गुरू संगीत विद्यालय,(शाखा-वेंगुर्ले)” याचा शुभारंभ गुरुवर्य निलेश मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या विद्यालयाच्या माध्यमातून शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, हार्मोनियम व तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण तसेच गांधर्व महाविद्यालयाचा प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंतच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची शिकवणी घेतली जाणार आहे.
सकाळच्या सत्रात गुरूपौर्णिमे निमित्त श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या गायकांनी पार्सेकर दत्तमंदिर (कैवल्याश्रम मंदिर) येथे दत्तगुरुंचरणी सुमधूर अभंग, भक्तीगीते सादर केली. सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, संगीत अलंकार डॉ. श्रीराम दिक्षित, संगीत विशारद भास्कर मेस्त्री, विशारद केतकी सावंत यांनी आपल्या सुश्राव्य संगीतानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या शुभदिनाचे औचित्य साधून श्री सद्गुरू संगीत विद्यालय शाखा वेंगुर्लेचा शुभारंभ करण्यात आला. संचालक गुरुवर्य निलेश मेस्त्री यांच्या हस्ते या विद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. या मंदिरात असलेल्या विद्यालयातून दर शनिवार-रविवार तबला विशारद निरज भोसले, हार्मोनियम विशारद मंगेश मेस्त्री, संगीत विशारद भास्कर मेस्त्री वेंगुर्ला पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देणार आहेत.
श्री पार्सेकर (कैवल्याश्रम )मंदिरात या विद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य चौगुले म्हणाले, आजचा विद्यार्थीवर्ग मोबाईलमध्ये गुरफटून गेला आहे. मुलांच्या मेंदूवर त्याचा परिणाम होत आहे. संगीत विद्यालयासारख्या उपक्रमातूनच आजच्या विद्यार्थ्यांना मोबाईलमधून बाहेर काढता येईल असं मत व्यक्त केले. अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब म्हणाल्या, वेंगुर्लेभुमी ही कलावंत, साहित्यिक, दिग्गजांची भूमी आहे. या भूमीतून बॅ.नाथ पै, मंगेश पाडगांवकरांसारखी रत्न कोकणाने दिली. इथली लोक प्रेमळ आहेत, कलेची जाण असणारी आहेत. त्यामुळे या संगीत विद्यालयातून निश्चितच चांगले गायक, वादक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते राहूल प्रभूसाळगावकर, तबला वादक किशोर सावंत, सोमा सावंत, डॉ. श्रीराम दिक्षित, अनघा गोगटे, माजी नगरसेविका अँड. सुषमा खानोलकर, श्रेया मयेकर आदींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात गुरूवर्य निलेश मेस्त्री म्हणाले, कै. गुरुवर्य विठ्ठलराव पै, कै. गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, हार्मोनियम व तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण तसेच गांधर्व महाविद्यालयाचा प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रमाचे धडे विद्यालयात गिरवले जातात. सावंतवाडीच्या विद्यालयातून आजवर असंख्य विद्यार्थी घडलेत. त्यांनी देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. आज माझ्या विद्यार्थ्यांनी वेंगुर्ला येथे संगीत विद्यालयाचा शुभारंभ केला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी यापेक्षा मोठी गुरूदक्षिणा एखाद्या गुरुसाठी असेल असं वाटत नाही अशा भावना श्री. मेस्त्री सर यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे-परब, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य चौगुले, माजी नगरसेविका अँड. सुषमा खानोलकर, श्रेया मयेकर, अनघा गोगटे, डॉ. श्रीराम दिक्षित,तबला वादक किशोर सावंत, सामाजिक कार्यकर्ते राहूल प्रभूसाळगावकर, सोमा सावंत, हेमंत खानोलकर, पुजा दळवी, अँड. सिद्धी परब, नितीन धामापुरकर, मानसी भोसले, भावना सावंत, श्रीकांत जोशी, सोनाली प्रभूसाळगावकर, दत्ता कुळकर, केतकी सावंत, सर्वेश राऊळ, गोविंद मळगावकर, स्वप्निल राऊळ, ऋतिक परब, वैभव परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरज भोसले, स्वागत भास्कर मेस्त्री यांनी केले. सुत्रसंचालन विनायक गांवस तर आभार मंगेश मेस्त्री यांनी मानले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*