You are currently viewing गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*🙏गुरुपौर्णिमा 🙏*

 

गुरुपौर्णिमा, गुरुपूजानाचा पवित्र दिवस. गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरु ब्रह्मा आहे. गुरु विष्णु आहे. गुरु महेश म्हणजे शंकर आहे. ; गुरु च साक्षात् परब्रह्म आहे.अश्या सद्गुरु ना मी प्रणाम करतो.

हा श्लोक महर्षि वेदव्यास जी द्वारा रचित ‘गुरु गीता’ मधील आहे

गुरु गीता मधे माता पार्वती भगवान शिव ला गुरु च्या महत्वाविषयी विचारते. या श्लोकातून भगवान शिव गुरु चे महत्व विषद करीत आहेत.

गुरु – ‘गु’ का अर्थ अंधकार रूपी अज्ञानता, ‘रू’ का अर्थ दूर करणारा. गुरु अज्ञानता रुपी अंधकाराला दूर करतो.

*र्ब्रह्मा – र्ब्रह्मा जी ना या सृष्टि चा निर्माता” म्हटले आहे. गुरु शिश्याला ज्ञानाच्या गोष्टी शिकवितो. अज्ञानाचा अंधार दूर करून त्याला ज्ञानाचा रस्ता दाखवितो. म्हणून गुरुची तुलना सृजन कर्ता ब्रह्मा जी शी केली आहे.

*विष्णु – विष्णु ला सृष्टि चा पालनहार म्हटले आहे. गुरु आपल्या शिष्याचे सगळे भ्रम दूर करतो. आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्ञानाचे रक्षण करतो. म्हणून गुरु विष्णुसमान आहेत.

*महेश्वर – महादेव भगवान शिव ला संहारक म्हणतात. गुरु आपल्या शिष्याच्या अज्ञानाचा नाश‌ करतो. तेंव्हा तो भगवान शिव च्या समान कार्य करतो.

आणि तिसरे महत्वाचे म्हणजे या तिघांचाही अध्यक्ष अश्या परम तत्वशी गुरुची तुलना केली आहे.

प्रत्येकाला गुरु असलाच पाहिजे अन्यथा त्याचे जीवन दिशाहीन, अपूर्ण राहते. गुरु म्हणजे पूर्णत्व प्रदान करणारा,, गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशकडे नेतो. अशी पुराणात कितितरी गुरु शिष्य मिळतात. अगदी अलीकडे सुद्धा अशी कितीतरी गुरु शिश्यांची आदर्श उदाहरणे आहेत.

संदीपनी .. कृष्ण, वाशिष्ठ.. राम, रामकृष्ण परमहंस… विवेकानंद, अचरेकर गुरुजी.. सचिन तेंडुलकर

जो शिष्य गुरुप्रती एकनिष्ठ असतो त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एव्हढेच नव्हे तर गुरुचे ते कर्तव्य असते. ते तो स्वधर्म म्हणून पाळतोच पाळतो.

पूर्वीच्या काळी गुरुगृही जाऊन, तिथे राहून ज्ञान संपादन करण्याची प्रथा होती. तिथे अजिबात भेदभाव नव्हता. राजाचा मुलगा असो की एखाद्या सर्वसामान्य माणसाचा. सर्वाना समान अशी वागणूक त्याकाळाचे ऋषी मुनी म्हणजेच गुरु याकडून दिली जायची आणि तो शिष्य ज्यामध्ये पारंगत व्हायचा त्याप्रमाणे त्याचा पुढील कार्यकाळ, अभ्यास रहायचा. नंतर त्यामध्ये बदल होत गेले आणि आता ती परंपरा आजच्या शिक्षकांचे पर्यंत येऊन पोहोचली. आजचे शिक्षक काय करतात? विद्यार्थ्यांना शिक्षित करतात. शिक्षित करणारा तो शिक्षक. तेही अभ्यासक्रमातील सर्व शिकवतात. दैनंदिन आचारणात कसे असावे हे शिकविले जात नाही. ते जे शिकवतात त्यांना आचार्य म्हणतात. दिलेले शिक्षण आचरणात उतरविणारे ते आचार्य. आणि शिष्याला सर्वांगीण, परिपूर्ण करणारे ते गुरु.

माझ्यापेक्षा माझा शिष्य मोठा झाला पाहिजे ही आंतरिक तळमळ त्यांची होती. शिष्यानी आपण शिकवू ते सर्व आचारणात अगदी मनापासून आणावे एव्हढीच अपेक्षा त्यांची शिष्याकडून होती. त्याच्या बदल्यात त्यांना काही नको असायचे. मग शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वगृही पाठवताना शिष्य स्वेच्छेने कृतज्ञता म्हणून काही तरी गुरुना समर्पण करायचा. त्याला गुरुदक्षिणा म्हणण्याचा प्रघात होता. गुरूंना काहीही लौकिक असे नको असायचे पण शिष्याच्या आनंदाखातर ते स्वीकारायचे.

वाशिष्ठानी राम लक्ष्मणना यज्ञात विघ्न आणणाऱ्या असुरपासून रक्षण करण्यास सांगितले. ते त्यांनी आनंदाने केले

संदीपाणी नी कृष्णाला, परमानंद नी विवेकानंदाला , एकालाव्यानी द्रोणाचार्य यांनी एकलव्य, अर्जुनाला काय काय मागितले आणि आणि शिष्यानी ती आज्ञा समजून कृतार्थ भावनेने ते सर्व केले. ही ती गुरुदक्षिणा. हे समर्पण असायचे. तिथे घेणाऱ्याचा हात वर असायचा. आता घेणाऱ्याचा हात खाली असतो देणाऱ्याचा वर असतो. राष्ट्रीय स्वयंम सेवक संघामध्ये गुरु दक्षिणाची प्रथा परंपरागत एका विशिष्ठ पद्धतीची ठेवलेली आहे. ती समर्पण या सार्थ अश्या यथार्थ नावाने प्रचलित आहे. ती गेल्या 99 वर्षापासून जाशीहोती तशीच आहे. त्यात अजिबात बदल नाही. जी बदलत नाही ती शाश्वत असते चिरंतन असते. तात्विक असते. ते समर्पण नावाचे एक तत्व आहे. तसेच आणखी एक तत्व rss नी स्वीकारले ते म्हणजे गुरुतत्वासाठी साठीचे ओरटीक. व्यक्ती, व्यक्तिमत्व, व्यक्तित्व यापेक्षाही पुढचे असे ते तत्व आहे. अविरात लहरणारे, शौय त्याग समर्पण या भावनानी युक्त असणारे तत्व. जे पुरुषार्थ आणि प्रकृती या दोन मुल तत्वाच्या संयुगानी बनलेले असे आहे. शिवाजी महाराज, राणा प्रताप, राम कृष्ण इत्यादी अनेक युग पुरुषांनी ज्याला स्वीकारलेल्या भगव्या ध्वजाला rss नी गुरुस्थानी ठेवले. यज्ञातील ज्वाला जस्या भासाव्यात तसा याचा रंग आहे. यज्ञ कश्यासाठी तर पर्यावारणाला आणि सामाजिकतेला दृष्ठ प्रवृत्तीपासून दूर ठेवाण्यासाठी. त्यातून निर्माण होणाऱ्या ज्वाळेचा रंग असणारा भगवा ध्वज हा गुरुस्थानी आहे. डॉक्टर हेडगेवारांना सहज सर्वांनी गुरुस्थानी स्वीकारले होते पण ते त्यांनी आव्हेरले आणि भगव्या ध्वजाला गुरु केले.

ॐ असतो मा सद्गमय ।

तमसो मा ज्योतिर्गमय ।

मृत्योर्मा अमृतं गमय ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

संपूर्ण मंत्राचा अनुवाद असा आहे:

“आम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे,

अंधारातून प्रकाशाकडे आणि

मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जा.”

हे शुद्धीकरण प्रार्थना म्हणून वापरले जाते जे स्वतःच्या कल्याणासाठी किंवा मानवतेसाठी जपले जाते.

हे गुरुचे महान कार्य आहे.

अश्या महान गुरु चरणी आपण आज वंदन करू यात.

 

*🌹🌹🙏पांडुरंग कुलकर्णी नाशिक 🙏🌹🌹*

प्रतिक्रिया व्यक्त करा