पत्रकार समीर म्हाडेश्वर पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित…
समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन
आज गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांचा अभिनेते, दिग्दर्शक अनिल गवस यांच्या हस्ते पञकारिता- दशावतार सेवा पुरस्काराने आज सन्मान करण्यात आला.
या कर्तुत्ववान रत्नवीरांचा सन्मान सोहळ्याचा शुभारंभ अभिनेते दिग्दर्शक अनिल गवस,दिनेश उघडे समाजसेवक, उद्योजक, मुरबाड, सौ नेहा धुरी, सुरेश दादा बारशिंग, मेघराज राजे भोसले, , माजी सैनिक मेजर तायडे, बी. एन. खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आला.
हा पुरस्कार साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव अशा विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून राष्ट्रहितासाठी गेली अनेक वर्षे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा व उदंड शक्ती समाजात कार्यरत असणाऱ्यांना दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी समीर महाडेश्वर यांना जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बी एन खरात यांनी केले.