You are currently viewing सावंतवाडी शहराच्या वैचारिक जडणघडणीत अल्ताफ खान यांच मोठ योगदान

सावंतवाडी शहराच्या वैचारिक जडणघडणीत अल्ताफ खान यांच मोठ योगदान

*सावंतवाडी शहराच्या वैचारिक जडणघडणीत अल्ताफ खान यांच मोठ योगदान*…

*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू*

आपण माॅरेशसमध्ये असताना माझे मिञ ऍड. नकुल पार्सेकर यांच्याकडून कळसुलकर हायस्कूल सावंतवाडीचे माजी मुख्याध्यापक अल्ताफ खान सरांच्या अकाली दुःखद निधनाची बातमी समजली. फार वाईट वाटलं. मी जेव्हा जेष्ठ संसदपटू स्व. नाना दंडवते यांच्या विरोधात निवडणूक लढवली व विजयी झालो त्यावेळी त्यांनी मला शुभेच्छा देतानाचे त्यांचे शब्द आजही आठवतात. खरं तर ते नाना दंडवतेंच्या प्रचारात हिरीरीने तेव्हा कार्यरत होते. तेव्हा खान सर म्हणाले होते.. नाना हरले याच दु:ख आहेच पण तळकोकणातील या राजापूर लोकसभा मतदारसंघाला एक वैभवशाली वैचारिक अधिष्ठान असलेली बॅ. नाथ पै, नाना दंडवते यांची परंपरा आहे आणि ही परंपरा पुढे चालवणारा प्रतिभावंत उमेदवार खासदार झाला याचाही आनंद आहे. त्या काळात निवडणूकीत जय पराजय किती खेळीमेळीने घेतला जात असे याचं हे उदाहरण आहे.
सावंतवाडी शहर हे संस्थान कालीन शहर असून या शहराला एक सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचा वारसा लाभलेलं शहर. अल्ताफ खान सर हे अतिशय ज्ञानी होते आणि व्यासंगीही. त्याच्या ज्ञानदानाच्या कक्षा उंतुग होत्या ज्याचा उपयोग सावंतवाडी शहर आणि जिल्हावासियानां झाला. आज आपण एका ज्ञानयोग्याला मुकलो. इश्वर त्यांच्या आत्म्मासं चिरशांती देवो. अशा शब्दांत मा. सुरेश प्रभू यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा