सावंतवाडी :
आजगाव येथे विविध विषयाच्यां शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप आणि सहावी-सातवीसाठी एस्टीएस व गणित हे वर्ग गोगटे गुरुजी प्रतिष्ठान आणि आजगाव हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहेत. एकूण २० मुलांनी प्रवेश घेतला असून मार्गदर्शन विनामूल्य असणार आहे. प्रतिष्ठान तर्फे पाचवीच्या मुलांना आणि संघामार्फत आठवीच्या मुलांना स्कॉलरशिप पुस्तकांचे सेट भेट देण्यात आले. यासाठी मुंबईस्थित हरीश मसुरकर यांनी पाच हजार रुपये आर्थिक मदत केली. गतवर्षीची पाचवी स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वेदांत देशमुख, अथर्व हळदणकर, प्रचिती शेटये,राही पांढरे आणि गणेश खोबरेकर या पाच मुलांना घनश्याम जोशी यांचेकडून प्रत्येकी शंभर रुपये रोख बक्षिस देण्यात आले. यानंतर झालेल्या पालक सभेत समन्वयक विनय सौदागर यांनी मार्गदर्शन केले व शैक्षणिक वर्गाविषयी विस्तृत चर्चा करणेत आली. एकूण अडीचशे तास शिकविण्याचे नियोजन करणेत आले. यावेळी सर्व पालक व मुले उपस्थित होती. वर्गासाठीची जागा कै. बाबल पांढरे कुटुंबियांनी विनामोबदला दिली आहे.
युसुफ आवटी, प्रियांका देशमुख, मनोज खोबरेकर,दीपक हळदणकर, भावना पांढरेआणि सौ.आरोलकर यांनी चर्चेत भाग घेतला. मोहन परब, वेदिका शेटये, युगंधरा पांढरे, संदेश नाईक, सुनील वैज, संदिप पांढरे, धनंजय पांढरे आदी पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश जोशी, एकनाथ शेटकर, प्रकाश मिशाळ आणि अनिता पांचाळ यांनी परीश्रम घेतले. दिलीप पांढरे यांनी आभार मानले.