*****************🏬🏬 वृदधाश्रम 🏬🏬
काल मला एक म्हातारी आजी रस्त्यात मिळाली. मला म्हणाली , “खूप भूक लागली आहे, काही आहे का खायला?”. नेहमीप्रमाणे माझ्या पर्स मध्ये एक बिस्किट पूडा होता. मी तिला देऊ का विचारले आणि ती आनंदाने हो म्हणाली. जवळचे पाणी तिला दिले. तिच्याकडे पाहून तिचे मन शांत झाल्याचे जाणवले मग मला सुदधा समाधान झाले. तिची विचारपूस केली असता कळले की ती तिथे एकटीच आली होती आणि आता तिला तिच्या घरी जायचे होते मग तिला मी माझ्या गाडीने नेवून सोडले ती रस्ता दाखवायची आणि मी गाडी चालवायची असाच प्रवास चालू होता आणि आले तिचे घर. मी पाहते तर काय तिच्या घराचे नाव होते “वृदधाश्रम”.
जी म्हातारी मला पूर्ण रस्त्याने तिच्या मुलाची महती सांगत होती की तिचा मुलगा किती चांगला आहे, तिची सून किती चांगली आहे तर मला पण वाटले की खरच ही छान एकत्र कुटुंबात राहत असेल खुश असेल पण जसे तिच्या घराचे नाव वाचले तसे माझ्या डोळयात टचकन पाणी आले. ती आनंदाने गाडीवरुन उतरली आणि मला म्हणाली, “ सुखी रहा ग पोरी, खुप मोठी हो, तुझे सर्व कार्य गणेशा पुर्ण करो.” मला खुप छान वाटले. तिने मला घरात येण्यास विनवणी केली आणि नकळत मी सुदधा ती मान्य केली. आम्ही घरात गेलो तर मी पाहते तर काय जवळपास ५० स्त्रिया व ७० – ८० वृदध माणसे तिथे एकत्र बसलेली दिसली. काही गोष्टी करीत होती, तर काही देवासाठी हार करत होती, कोणी भजन गात होते, तर कोणी कांबीच्या टोपल्या विणत होते, एवढया वयात मात्र सर्वजण काही ना काही करत होती. आम्ही दोघी तिच्या खोलीत पोहोचलो, मी बसली तेवढयात माझी नेहमी ची निरीक्षण करण्याची सवय म्हणून मी तिची सर्व खोली बघत होती. तिच्या खोलीमध्ये एक छान गणेशजी ची मूर्ती दिसली. त्याच्याच बाजूने तिच्या पूर्ण परिवाराचा फोटो दिसला. त्यामध्ये तिचा पूर्ण परिवार होता. मी एकटक त्या फोटोकडे बघत असल्याचे बघून तिने तो फोटो जवळ घेवून मला दाखविला सर्वांची ओळख करुन दिली आणि शेवटी ती म्हणाली, “माझ्या मुलाचा परिवार थोडा मोठा आहे मग तिथे त्यांना व्यवस्थित जागा होत नाही ना म्हणून काही दिवसासाठी त्याने मला इथे ठेवले आहे मी लवकरच इथून जाणार आहे, तू ये मग माझ्या मुलाच्या घरी आता तु पण माझी मुलगी झाली आहेस ना”. माझ मन एकदम गहिवरून आले. मी म्हटले, “ हो आजी, येणार मी नक्की”. संध्याकाळ होतांना पाहून मी तेथून जाण्यास निघाली. जशी खोली च्या बाहेर निघाली तसाच माझ्या आजूबाजूला सर्व वृध्द स्त्रीयांचा घोळका तयार झाला. मी सर्वासोबत थोडी बोलली तर सर्वांनी मला स्वत:ची मुलगी मानून भरभरून आशिर्वाद दिले. सर्वांनी मला अधून मधून येण्यास सांगितले. माझ अंतकरण दाटून आले आणि मी जड पावलांनी त्यांची रजा घेतली.
घरी आल्यावरही मला त्या आजीचा तो भुकेला केविलवाना चेहरा आणि त्यानंतर ती मला तिच्या परिवाराचा फोटो दाखवत माहिती सांगत होती तो चेहरा स्पष्ट दिसत होता. त्या म्हाताऱ्या जीवाला खरच काय वाटत असेल याची कल्पना सुदधा केली तरी माझ्या अंगावर शहारे येतात. ज्या छोटयाशा बाळाला लहानाचे मोठे केले, एका छोट्याशा खोलीत राहून त्याला पूर्ण जगाची शिकवण दिली आज त्याच मुलाला एक आई घरात ठेवायला जागा नाही म्हणून वृदधाश्रमात ठेवले तेही मी लवकरच घ्यायला येईल या आशेवर. त्यामध्ये ती एकटी आजीच काय तर तेथील प्रत्येक स्त्री याच आशेवर जीवन जगताना दिसते की मला आज ना उदया माझ्या घरचे न्यायला येतील आणि मग मी इथून जाणार. सर्वांचे डोळे त्या वाटेकडे एकटक पाहत असतात, पण दिवसांमागून दिवस जातात पण घरचे कोणीही घ्यायला येत नाही आणि शेवटी घ्यायला येतो तो परमेश्वर. वाट बघत बघत तिचे प्राण निघून जातात तरी तिच्या परिवाराला काहीच माहीती नाही.
खरच कुठे जात आहोत आपण??? आपण नेहमी म्हणतो आपला देश हा विकसनशील कडून विकसित राष्ट्राकडे मार्गक्रमण करीत आहे. पण हे दृश्य बघितल्यावर तर मला तरी असे वाटते की ते अधोगतीकडे जातांना दिसत आहे. हो मला मान्य आहे आपण खुप मोठे शोध लावले, आपण खूप मोठी प्रगती केली, पण ती राष्ट्रीय स्तरावर, पण मग संस्कृती च्या स्तरावरचे काय् ? पुजा पाठ करणे, वेगवेगळी व्रत , वैकल्ये करणे, मोठ मोठे भागवत सप्ताह आयोजित करणे आणि आई वडिलांना घरात डांबून ठेवणे यालाच आपण संस्कृती टिकवत आहोत व तिचे योग्य संक्रमण करीत आहोत असे करत असल्याचे जाणवते. यातही काही अपवाद आहेतच. जे खरोखर त्यांच्या आई वडिलांना देवा सारखे समजून नित्य काळजी घेत असतात. कारण खऱ्या संस्कृतीचा आधारस्तंभ तर आपले ज्येष्ठ आई बाबा, आजी आजोबा हे आहेत. घरात जेव्हा सून येते तेव्हा तिला घराच्या चालीरीती समजावून सांगणारी आजी बाई, घरातील पुर्ण कुटुंबाचा इतिहास सांगणारे ते आजोबा, कोणाला काय आणि कस आवडते ते अत्यंत काळजी व आनंदाने सांगणारी ती सासूबाई, स्वत:च्या घराच्या चालीरिती समजावून सांगणारे सासरे, त्यानंतर काही दिवसाने गर्भवती सूनेला बाळ होईपर्यंत व बाळ झाल्यावर सुदधा काय कशी काळजी घ्यायची, बाळाच काय दुखतय त्याला नेमक कधी काय हव असत हे सर्व सांगत असलेले ते सर्व म्हातारे लोक, नातू ला योग्य संस्कार लागावे यासाठी संध्याकाळी घेतलेला तो हरिपाठ, सकाळी उठण्याच्या सवयी रात्री च्या सवयी एकूणच काय लहान मुलांपासून ते मोठया मुलांपर्यंत घराची धुरा सांभाळणारे तेच आजी आजोबा, आज या आधुनिकतेच्या नावाखाली काय छळ चाललाय त्यांचा, काय तर म्हणतात त्यांना आजकालच्या हाय सोसायटीचे STANDARDS कळत नाहीत. त्यांना बाहेरच्या लोकांसमोर काय बोलाव व काय बोलू नये हे कळत नाही. पण आपण हे कसे विसरतो की ज्यांनी आपल्याला पाणी कसे प्यावे, जेवण कसे करावे एवढेच काय स्वत:ला स्वच्छ कसे ठेवावे इथपर्यत सर्व त्यांच्या निगरानीत पदधतशीर शिकवले त्यांना या जगाचे STANDARDS कळत नाहीत. आणि हेच त्यांना कळत नाही म्हणून त्यांना वेगळे ठेवायचे म्हणजे ते आरामात छान राहू शकतील. त्यामुळे त्यांना मग वृदधाश्रम सारख्या पिंजऱ्यात कैद करून ठेवायचे. इकडे हजारो ने किटी पार्टीस, बचत गटाच्या पार्टी, BC च्या पार्टी अजून ज्या असतील नसतील त्या करायच्या आणि जी माऊली आणि जे वडील धारी आजोबा असतात त्यांना वृदधाश्रमात ठेवायचे.
खरच काय दयनीय स्थिती आली आहे ही. हे नक्कीच बदलायला हवे आणि यासाठीच माझ्या मते, आपल्या शिक्षकांना खूप मोठी संधी मिळाली आहे ती म्हणजे या भारतातील सर्वात मोठी संपत्ती जपण्याची. आपली संस्कृती टिकविण्याची, आपण आपल्या विदयार्थ्यांसोबतच समाजप्रबोधनातून सुदधा या अनमोल संपत्तीचे रक्षण करु शकतो. मुलांमध्ये योग्य मूल्यांची रुजवणूक करून चांगली शिकवण दिल्यास मुले ते लवकर आत्मसात करीत असतातच. जेव्हा या मुलांना आजी आजोबांचे महत्व कळेल तेव्हा त्यांच्या आई बाबाना सुधा त्यांच्या आई बाबांचे महत्व कळणार. चला तर सुरुवात करूया संस्कृती टिकविण्याची आणि आपल्या देशाचा आधारस्तंभ बळकट करण्याची.
✍️हर्षा बाबुराव खंडागळे.
खामगाव जिल्हा बुलढाणा.
मो. नं. :- ९८९०९९४७४१._
___________________________
*संवाद मीडिया*जाहिरात
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*७ वर्ष ७लाख कार्स..*
*७ लाख समाधानी कुटुंब*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*काय यंदाची दिवाळी जुलै मध्ये..??*
होय.. टाटा मोटर्स सादर करीत आहेत
🏆सेलिब्रेशन ऑफर्स🏆
👨👩👧👧 *जॅायफुल जुलै* 👨👩👦👦
₹.1️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
पर्यन्त चे डिस्काउंट्स
✅सेफ्टी , परफ़ॉर्मन्स , फ़ीचर्स
आता सगळं काही एकाच कार मध्ये
❤️❤️ *टाटा नैक्सोन* ❤️❤️
आता सर्व काही एकत्र ते देखिल
✅केवळ *७.९९ लाख* पासुन ( स्वागत मूल्य)
भारताची सर्वाधिक विकली जाणारी एस.यु.वी. आणि
✅*५ स्टार सेफ्टी* रेटिंग मानांकित या श्रेणी मध्ये एकमेव कार
*On the spot exchange*
💯% on road finance
🇮🇳🇮🇳*संपुर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳
त्वरा करा.. आजच भेट दया अथवा कॅाल करा
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली | ओरस
*7377-959595*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*