You are currently viewing धुंद पाऊस

धुंद पाऊस

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*धुंद पाऊस*

 

रानी वनी धुंद पाऊस पडे गोकुळी,

गाई गुरे मोर विसावती तरूतळी,

निर्झर भरले खळाळती कपारी,

ओली धरती पाऊस माथ्यावरी,

त्या तिथेच बाळ क्रिष्ण सावळा अधरी निनादे बासरी,

भिजत कदंबाखाली छेडतो मधुर अलगुज स्वर,

भाळी भुरभुरती कुंतल सुंदर,

शिरी डोलते मोरपीस वार्यावर,

सावळे सुंदर राजस सुकूमारते रूप,

चाहुल लागे सत्वर राधेला,

ऐकूनी स्वर धुंद करती,

पावसात अशा धावत येई राधा,

हुडकत त्या घननिळा,

सुर बासरीचे वेडाऊन टाकीती तनामनाला,

सावळ्याची बाधा होई त्या वेडीस,

त्यासह धुंद पावसात पुरी होई निळुली,

रंगली रासक्रिडा कदंबाखाली,

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुं. ६९

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा