You are currently viewing आषाढी

आषाढी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आषाढी*

〰️〰️〰️

आषाढी घनमेघ आले

ऋतुपर्व , कृतार्थी झाले

विठुरायाच्या भेटीसाठी

वैष्णव दिंडीसवे चालले….

 

मुखी नाम विठ्ठल विठ्ठल

नामात संत सारेच दंगले

विश्वरूपी ब्रह्म ते सावळे

वाळवंटी अभंगात रंगले….

 

द्वैतअद्वैताचे मिलन सुंदर

भेदाभेद पूर्ण लयास गेले

नादात त्या टाळमृदंगांच्या

आसमंत ,सारेच भारावले….

 

आज उतरता , स्वर्ग भूधरी

जन्माचेच , सार्थक जाहले

तृप्त नेत्री पाझरता ब्रह्मानंद

द्वार , मोक्षमुक्तीचे उघडलेले….

 

भावश्रद्धेच्या या महासागरी

भक्तीरूप ,चिदानंदी दंगलेले

सामोरी मायमाऊली सावळी

पंचतत्वात नंदादीप उजळलेले….

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*रचना क्र. : १४३ /

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा