You are currently viewing आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

*ज्येष्ठ कवयित्री सौ.कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आषाढी एकादशी* 

 

देवशयनी एकादशी

सण हा पांडुरंगाचा

सोहळा छान रंगतो

नामात पंढरपूरचा १)

 

पंढरीच्या वाटेने

चालतात वारेकरी

मुखात असतो त्यांच्या

जय राम कृष्ण हरी २)

 

भाळावर असे टिळा

गळ्यात तुळशीमाळ

पांडुरंगाच्या नामात

सुखवतो मुग्ध काळ ३)

 

रुप ते पांडुरंगाचे

उभे असे विटेवरती

दर्शनात फुललेले

आनंदात ही धरती ४)

 

भक्तांचा सोहळाच

पंढरपूरात जमलेला

कितीही पाय थकले

भक्तिभाव न हरलेला ५)

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा