You are currently viewing तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा मी तिथे हजर होईन; त्या बदल्यात एनसीबीला जी यादी देणार होतात ती द्या…

तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा मी तिथे हजर होईन; त्या बदल्यात एनसीबीला जी यादी देणार होतात ती द्या…

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर नेहमीच एकमेकींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी नवीन कार्यालय खरेदी केले आहे. त्यांनी तीन कोटींचे नवीन कार्यालय घेतल्यानंतर कंगना रनौतने तिच्या नवीन ऑफिसला लक्ष्य केले आहे.

ट्विटमध्ये मध्ये कंगनाने लिहिले होते की, ‘उर्मिला जी मी स्वत: च्या मेहनतीने घरे बांधली होती, कॉंग्रेस त्यांना तोडत आहे. भाजपाला खुश करण्यासाठी माझ्यावर फक्त २०-२५ केस आहेत. माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या इतकी हुशार असते आणि कॉंग्रेस सोबत आले असते. खरच मी मूर्ख आहे. असा टोला कंगनाने उर्मिलाला लगावला होता.

त्याबदल्यात, उर्मिला मातोंडकर यांनीही कंगणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

व्हिडीओत उर्मिला म्हणत आहे की, ‘कंगना तुमचे जे माझ्याबद्दल उच्च विचार आहेत, ते मलाच काय संपूर्ण जगाला माहित झालेत. तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा. मी तिथे हजर होईल आणि सोबत माझ्या मालमत्तेचे कागदपत्रं घेऊन पोहोचेल. मी 2011 मध्ये अंधेरीमध्ये जो फ्लॅट घेतला होता त्याचे मी पेपर्स घेऊन येते. त्यानंतर तो फ्लॅट विकल्याचेही पेपर्स घेऊन येते. मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हे सगळे पुरावे देते. त्या मोबदल्यात तुम्ही तुम्ही फक्त एक काम करा एनसीबीला तुम्ही जी यादी देणार होतात, ती द्या. तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावे,आहेत याची माहिती मलाच काय पण  देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असे उर्मिला यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा