कुडाळ :
कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळ सदृश परीस्थींतीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भाजपा नेते श्री. निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
सरंबळ गावातील श्री. शैलेश परब यांच्या घरावर झाड कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तसेच दीपक वरक यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सरंबळ मधील श्री. रमाकांत परब यांच्या घरामागे असलेला डोंगर खचून मातीचा भराव घरावर आल्याने मोठ नुकसान झाले आहे.तसेच रमेश कोरगावकर यांच्या घरानजीक असलेली जमीन व माड बागायत नदीने गिळंकृत केले असून त्यांचे शेतघर व राहते घर यांना धोका निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे पिंगुळी येथील श्री. कृष्णा वासुदेव म्हापसेकर पिंगुळी (देवूळवाडी )आणि प्रभाकर महादेव दाभोलकर पिंगुळी (काळेपाणी) यांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सर्व नुकसान ग्रस्त कुटुंबाना भाजपा नेते सन्मा. निलेश राणे यांच्या माध्यमातून भरीव आर्थिक सहाय्य करण्यात आले.
यावेळी भाजपा कुडाळ मंडळ अध्यक्ष श्री.संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.रुपेश कानडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. पप्या तवटे, मा. पंचायत समिती सदस्य श्री. संदेश नाईक, सरंबळ सरपंच श्री. रावजी कदम, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, श्री.आनंद शिरवलकर, कुडाळ नगरसेवक श्री. निलेश परब, मा. नगरसेवक श्री.सुनील बांदेकर, श्री.राकेश नेमळेकर, बाव मा.सरपंच श्री. नागेश परब, पिंगुळी ग्रा. प. सदस्य श्री. मंगेश चव्हाण, श्री.बाळा पावसकर, योगेश घाडी, निखिल कांदळगावकर, सरंबळ उपसरपंच श्री. सागर परब, बंटी गोसावी, सुनील हादगे, संजय परब, भाई गावकर, महेश सरंबळकर, मोहन कोरगावकर, प्रसन्न गंगावणे, सागर वालावलकर व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सर्व आपदग्रस्त कुटुंबीयांनी मान श्री. निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.