You are currently viewing कुडाळ नूतन पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मगदूम यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

कुडाळ नूतन पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मगदूम यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

कुडाळ :

कुडाळचे नूतन पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मगदूम यांची शिवसेना शिष्टमंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेट घेऊन कुडाळ तालुक्यात होणारे अवैध धंदे मटका, झुगार,गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन बेरोजगार होतात. यावर आपण वेळीच निर्बंध घालावेत अशी मागणी यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने केली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षा कुडाळकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर, शिवसेना तालुका संघटक श्री.अनिकेत तेंडुलकर, शिवसेना कुडाळ तालुका संघटक श्री.रमेश हरमलकर, शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. यशवर्धन राणे,शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे,शिवसेना प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी, शिवसेना उपतालुका संघटक श्री.संजय सावंत,शिवसेना महिला आघाडी तेंडोली महिला आघाडी विभागप्रमुख सौ.शुभांगी तेंडुलकर,शिवसेना उपविभागप्रमुख तथा ज्येष्ठ शिवसैनिक श्री.रामकृष्ण(मामा) गडकरी,श्री.रघुनाथ साधले,श्री.संदीप माळकर,श्री.महादेव तेंडुलकर,गोट्या शिरोडकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा