You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी

बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी

*बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी*

*बांदा*

बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी दिवशी आयोजित केलेली बांदा केंद्रशाळा व विठ्ठल मंदिर ही पायी वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली .
विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडीने बांदा शहरात विठ्ठलमय वातावरण तयार केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या दिवशी केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रखुमाई , विविध संत व वारकरी यांच्या वेशभूषा साकारलेल्या होत्या. यावेळी रिंगण व फुगडी यांचे आकर्षण ठरले. एरवी शाळेच्या गणवेशात असणारे विद्यार्थी आज पांढरा सदरा,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, हातात पताका आणि नऊवारीत असलेल्या मुली,केसात गजरा असा पेहराव करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी बांदा केंद्र शाळेपासून सुरू केलेली ही दिंडी, कट्टा कार्नर ,बांदा बाजारपेठ,गांधी चौक येथून विठ्ठल मंदिरात दाखल झाल्यानंतर विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिरात अभंग गायन, फुगडी यांचे सादरीकरण करून उपस्थित विठ्ठल भक्तांची वाहवा मिळवली. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, उपशिक्षक जे.डी.पाटील ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, मृणाल परब सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक यांनी परीश्रम घेतले.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा