You are currently viewing भेट विठ्ठलाची

भेट विठ्ठलाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सरिता परसोडकर लिखित अप्रतिम षष्टाक्षरी काव्य*

 

*भेट विठ्ठलाची*

 

सावळ्या विठ्ठला

उशिर लाविला

तुझ्या द्वारी आलो

तुला भेटण्याला

 

विटेवरी उभा

कसा तू राहिला

तुझं पाहण्याला

नामदेव आला

 

कामात दंगला

नामात रंगला

जनी संगे कसा

दळू तू लागला

 

सावता तो माळी

कधी नाही आला

तुझ्या पंढरीला

तरी तू पावला

 

यावली ती तुझी

आवडती झाली

काळ्या म्हणे तुला

तरी कृपा केली

 

येरे बा विठ्ठला

दिनाची या हाक

स्मरतो मी तुला

दिनरात धाक

 

घालते मी सदा

तुला दंडवत

मला पामराला

देई देई हात

 

सौ परसोडकर

प्रतिक्रिया व्यक्त करा