*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.भारती वाघमारे लिखित अप्रतिम अभंग*
*विठ्ठल*
देव माझा आहे /विठ्ठल सावळा/
गळा घाली माळा /तुळशीच्या//
पायी वारी दिंडी /निघाली पंढरी/
भक्त वारकरी /भजनात//
हरी मुखे नाम /चिपळी मृदुंग/
चाले भक्ता संग/पायी पायी//
बोलावे विठ्ठल/ भजनात दंग/
आनंदाचे रंग/ रिंगणात//
वाजवी टाळी/मुखे नाम हरी/
चाललेत पंढरी /दर्शनाला//
सौ भारती वाघमारे
मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे