You are currently viewing शासनाच्या जाचक अटीतून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची सुटका करू – डॉ.दीपक परब

शासनाच्या जाचक अटीतून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची सुटका करू – डॉ.दीपक परब

मसुरे :

जीएसटी, आयकर तथा शासनाच्या अशा अनेक जाचक अटीतून व्यापारांची सुटका करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून सुरू आहे. यासाठी विविध जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. राज्यभरात संघटनेचे जाळे उभारून व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचा नेहमी प्रयत्न राहणार आहे. बीड जिल्हा सहित येथील जवळच्या सर्व जिल्ह्यातील चेंबर्सचे सदस्य वाढविण्याचा उपक्रम हाती घेतला असून आपण सर्वांनी चेंबरसाठी एक दिलाने काम करूया असे प्रतिपादन बीड येथे बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कोकण उपाध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी केले.

नुकताच बीड येथे व्यापारी महासंघाचा एक मेळावा संपन्न झाला.  यावेळी डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी सर्वांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही केले. यावेळी बीड जिल्हा व्यापारी संघ कार्याध्यक्ष अशोक आप्पा शेटे, जिल्हाध्यक्ष भास्करराव जाधव, दैनिक लोकशाचे संपादक विजयराज बंब, वाय जनार्धन राव, मराठवाडा चेंबर सचिव मनमोहन कलंत्री, अजय जाहीर पाटील, प्रकाश कानगावकर, तुकाराम साळुंखे, सुदाम चव्हाण, मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने विविध प्रश्नांबाबत डॉक्टर दीपक मुळीक परब यांच्याशी चर्चा विनिमय करण्यात आलि. यावेळी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने डॉक्टर दीपक मुळीक परब यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा