You are currently viewing जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचा योग्य वापर गरजेचा, स्मार्ट वॉचमुळे विद्यार्थी वेळेचा स्मार्ट वापर करतील: दयानंद कुबल

जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचा योग्य वापर गरजेचा, स्मार्ट वॉचमुळे विद्यार्थी वेळेचा स्मार्ट वापर करतील: दयानंद कुबल

जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचा योग्य वापर गरजेचा, स्मार्ट वॉचमुळे विद्यार्थी वेळेचा स्मार्ट वापर करतील: दयानंद कुबल

घड्याळाचा प्रत्येक सेकंद आपल्याला नव्या संधीची आठवण करून देतो.” जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे. घड्याळाच्या काट्यांनी आपल्याला शिकवलं आहे की, वेळ कधीच थांबत नाही; ती सतत पुढे जात असते. घड्याळ हे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्व समजावून देणारे साधन आहे. प्रत्येक क्षणाची कदर करण्यासाठी आणि आपल्या कृत्यांची योग्य वेळेवर पूर्तता करण्यासाठी घड्याळ आपल्याला प्रेरित करते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या जीवनात वेळेचे योग्य नियोजन आणि शिस्तबद्धता असणे आवश्यक असते. पण काही विद्यार्थ्यांकडे घड्याळ नसल्या कारणाने बऱ्याच वेळा विद्यार्थी शाळेत आणि कॉलेजमधे वेळेवर पोचू शकत नाही. त्यांना वेळेचे व्यवस्थापन करता येत नाही. असे अनेक विद्यार्थी शिक्षणामध्ये हुशार आणि अव्वल आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना कोकण कला व शिक्षण विकास संस्था डिजिटल पद्धतीचे २७५ स्मार्ट वॉच वितरित करत आहे. हा उपक्रम १६/०७/२०२४ रोजी सावंतवाडी मधील श्री पंचम खेमराज, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तर गुरुवारी पानवळ कॉलेज येथे सकाळी १०.०० वाजता होणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात व अभ्यासात या डिजिटल स्मार्ट वॉच चा खूप फायदा होईल. स्मार्ट वॉच हे केवळ घड्याळ नसून, ते एक बहुउपयोगी तंत्रज्ञान साधन आहे. यात वेळ दाखवण्याच्या सोबतच, विविध फिटनेस ट्रॅकिंग, स्मार्ट नोटिफिकेशन्स माहिती मिळते. सोबतच, ते कामाचे नियोजन करून वेळेवर कॉलेज आणि शाळे मध्ये जाऊ शकतात. अशा प्रकारे, स्मार्ट वॉच विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात अधिक सुसंघटित आणि प्रगतीकर बनवू शकतात. असे कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा