You are currently viewing वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी मुंबई येथे देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला

वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी मुंबई येथे देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला

सुरेश मापारी हे उत्तर मुंबई व मालाड विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे महामंत्री म्हणून कार्यरत..

 

मसुरे :

मालवण तालुक्यातील मूळ वेरली गावचे सुपुत्र आणि उत्तर मुंबई व मालाड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश मापारी यांनी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचे स्वागत मुंबई सांताक्रुज विमानतळावरती केले. तसेच सुरेश मापारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा विनिमय केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याची जबाबदारी काही मोजक्याच शिलेदारांवरती दिली होती. यामध्ये वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी यांचा समावेश होता. यावेळी सुरेश मापारी यांनी सांताक्रुज विमानतळ येथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वागत करून त्यांच्याशी चर्चा विनिमय केला. सुरेश मापारी यांचे मुंबई मालाड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मोठे सामाजिक कार्य असून आपल्या वेरली, मसुरे या गावीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात सुरेश मापारी यांची मोठी मदत असते. तसेच कोरोनाच्या काळातही अनेक गरजवंतांना त्यांनी वेळोवेळी मदत केली होती. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश मापारी यांना दिल्ली दौऱ्याचे सुद्धा यावेळी निमंत्रण दिले.

यावेळी बोलताना सुरेश मापारी म्हणालेत देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचे प्रत्येकाचे एक स्वप्न असते आणि हे स्वप्न आज माझे पूर्ण झाले असून जगातील सर्व सुखे मिळाल्याचा मला आज वाटत आहे. भारतीय जनता पक्ष आणि माझ्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी माझ्यावर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जी जबाबदारी टाकली होती याबाबत या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा