You are currently viewing बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव २०२४ निमित्ताने भव्य सत्कार..

बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव २०२४ निमित्ताने भव्य सत्कार..

बांदा :

 

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा आषाढ महोत्सव २०२४ निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंडळाला आज ३५ वर्षे पूर्ण झालेली आहे. सर्वप्रथम अशा प्रकारचे कार्यक्रम माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी सुरू केले होते. यामध्ये सांस्कृतिक मनोरंजनचे कार्यक्रम, समाज प्रबोधन विद्यार्थी व अनेक सेवाभावी संस्थांची सत्कार त्यांच्या माध्यमातून होत परंतु आता सदर कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून व्हावे. यासाठी पुढाकार घेऊन सदर कार्यक्रम आषाढ महोत्सव २०२४ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट सामाज सेवा करणाऱ्या संस्थेचा तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात येतो. दहावी बारावी शालांत परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम आलेली कुडाळ येथील अर्पिता सामंत हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच यश जीवबावीर, चैतन्य बांदेकर तसेच श्रुती तळगावकर या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बांदा वाफोली येथील जनजीवन विस्कळीत झाले होते अशावेळी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ७४ कुटुंबीयांना महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते तसेच २०२३ मध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमध्ये बांदा बाजारपेठ येथे रात्री एक ते पहाटे चार पर्यंत लोकांना मदत कार्य केले होते या सामाजिक कार्याची दखल घेऊन मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंडळ दरवर्षी आषाढ महोत्सव निमित्ताने विविध उपक्रम राबवून अशाच प्रकारची कौतुकाची थाप देत असते त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना अजून चांगलं कार्य करण्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा मिळते.

या मंडळाच्या वतीने दहावी मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रवी जाधव, रूपा मुद्राळे व सुजय सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.

या मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, शिक्षण सभापती तथा रोटरी अध्यक्ष प्रमोदभाई कामत, ग्रामपंचायत सभासद व मंडळाचे आधारस्तंभ विनायक भाई दळवी, उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, भाऊ वळंजु, माजी अध्यक्ष शशी पित्रे सल्लागार, श्वेता कोरगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप महिला जिल्हाध्यक्ष, भालचंद्र केळुस्कर, बुवा तुकाराम गावडे, ज्येष्ठ दशावतार आनंद गवस उद्योजक, अपेक्षा नाईक सरपंच मंडळाचे कार्यकर्ते समीर सातार्डेकर, भाई वाळके, साई काणेकर इत्यादी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. हा कार्यक्रम आनंदी हॉल बांदा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध मालवणी समालोचक बागल चौधरी यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार बाळा आकेरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा