You are currently viewing ठेवा कशास ताठा…

ठेवा कशास ताठा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ठेवा कशास ताठा…*

 

झालोय खास ऐसा

ठेवा कशास? ताठा…

जो की लयास नेता

ठरतो प्रवास आहे…।

 

तव-त्वेष तो भुतासम

फाजील स्वार माथी…

केवळ कयास भ्रम, नी..

भरतोय भास आहे…।

 

थोडाबहुत अहं तो

नसतो इथे कुणाला…

जपता अतीव केवळ

करतोय ऱ्हास आहे…।

 

प्राप्ती विशेष ऐसा

जन तो कुणा जुमाने…

धगता स्वयं उरी जर

जपतो हव्यास आहे…।

 

सामान्य जन असो वा

व्यक्ती विशेष कोणी…

तव दंभ स्वार्थ नादी

मुकतो सुखास आहे…।

 

तव तो कुणास सुटला

याला मला तयाला…

होवो न स्वार माथी

इतुकाच ध्यास आहे…।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा