*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम चित्र काव्य*
🙏 *लेकुरवाळा* 🙏
सावळ्या हरीचे रूप हे साजिरे
संत मांदियाळी विठूचे गोजिरे ||
ज्ञाना तुका नामा हाती कडी घेती
निवृत्ती सोपान सवे चालताती
लेकुरवाळे रूप पाहुनी भान नुरे
सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||
वाळवंटी सारे संत जमा झाले
संतांच्या मेळ्यात देव दंग झाले
मायबाप हरी संगे विठू घोष पसरे
सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||
वारीची पर्वणी जीव शिव जमले
चंद्रभागा तीर नाचू गाऊ लागले
दंग पंढरी क्षेत्र नामाच्या गजरे
सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||
ज्योत्स्ना तानवडे. पुणे