*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”वारीचा आनंद”*
पंढरीचा पांडुरंग रमतो वारीत
भक्तीचा भुकेला राहे दंग भजनातIIधृII
ठीक ठिकाणच्या पालख्या येती पंढरीत
टाळ मृदुंग घोष चाले नाम गजरांत
देहभान विसरती जन वारी प्रवासांत।।1।।
सर्व मंगल वारीत नसे भेदाभेद
बंधूभाव जपती सर्व नाम रंगात
गळाभेट घेती सुखदुःख विसरत।।2।।
वारीत मिळे अन्नप्रसाद मन तृप्त
कोणी भुकेला नाही याची काळजी घेत
वारी कधी संपू नये राहे वाटत ।।3।।
संत मांदियाळी रमे सर्वथा वारीत
आनंदाचा सोहळा न जाणवती कष्ट
निरिच्छ होई मन मिळे परमानंद।।4।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.