You are currently viewing उमेद फाउंडेशन तर्फे वामनराव महाडिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उमेद फाउंडेशन तर्फे वामनराव महाडिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली / तळेरे:

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथील विद्यार्थ्यांना उमेद फाउंडेशन यांच्यातर्फे दप्तर, वह्या, स्टडी पॅड, पाणी बाॅटल अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी विस्तार अधिकारी सुहस पाताडे, उमेदीयन जाकीर शेख, नितीन पाटील, दिपाली पाताडे,प्रिया पाताडे, प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर,ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे,डी.सी.तळेकर, ए.बी. कानकेकर,एन.बी.तडवी,एस.एस. पडवळ, पी.एन.कानेकर, ए.एस. गोसावी, एस.सी.शेटये, निकिता तर्फे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

उमेद फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत आहे.विविध क्षेत्रात काम करीत असताना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या संघर्षमय जीवनाला मदतीचा हात म्हणून उमेद फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती देण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील 500 विद्यार्थ्यांना या फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले,असे प्रतिपादन जाकीर शेख यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य उमेद फाउंडेशन करत आहे, आपणही यामध्ये सहभागी होऊयात,असे मत प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उमेदीन जाकीर शेख यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा