You are currently viewing बांदा येथे २९ जुलै ला काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन..

बांदा येथे २९ जुलै ला काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन..

बांदा येथे २९ जुलै ला काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन..

बांदा

नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष शांताराम मोर्ये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नट वाचनालय, बांदा येथे २९ जुलै ला संध्याकाळी ३.३० वाजता स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित असून दोन गटात होणार आहे.

पहिला गट इयत्ता पाचवी ते दहावी व दुसरा गट खुला गट आहे. स्पर्धकांनी स्वरचित पावसाळी कविता सादर करावयाची आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे ग्रंथपाल (मो. ९४०५५७०३४९) यांचेकडे २४ जुलै पर्यंत द्यावीत. या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा