You are currently viewing सावळे परब्रह्म

सावळे परब्रह्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*सावळे परब्रह्म*

 

 

झाली वैकुंठ पंढरी | क्षेत्र चंद्रभागे तीरी ||

सावळा बने श्रीहरी | उभा ठाके विटेवरी ||१||

 

क्षेत्र पावन भूवरी | विठुरायाची नगरी ||

त्रिखंडात तिच्या परी | नाही दुसरी पंढरी ||२||

 

अगा वैष्णवांच्या देवा | तुझ्या करूणेचा ठेवा ||

वाटे माहेर या जीवा | काय थाट म्या वर्णावा ||३||

 

भक्तांसाठी धाव घेशी | भक्तांच्या अधीन होशी ||

अभंग तारुन नेशी | भक्ती श्रेष्ठ अविनाशी ||४||

 

देई ऐसे वरदान | दूर सारावे अज्ञान ||

मिळविता आत्मज्ञान | शुद्धमती देई भान ||५||

 

आत्मबुद्धीसी सोडावे | भक्तीधन त्वा जोडावे||

सार्थक जन्माचे व्हावे | मुखी नाम सदा घ्यावे ||६||

 

 

*ज्योत्स्ना तानवडे.*

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा