You are currently viewing सावंतवाडी शहरातील भुयारी गटार योजनेसाठी अनुदान द्या – संजू परब

सावंतवाडी शहरातील भुयारी गटार योजनेसाठी अनुदान द्या – संजू परब

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी….

सावंतवाडी

शहरात भुयारी गटार योजना राबविण्यासाठी अनुदान द्या,अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. दरम्यान विकेंद्रित पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण करण्याची योजना राबवण्यासाठी पालिकेला केंद्र शासनाकडून मलनिः सारण योजनेअंतर्गत १५० लाखाचा निधी द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.प्रभू यांनी  येथील पालिकेला भेट दिली. यावेळी श्री.परब यांनी याबाबतचे निवेदन त्यांना दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद ही “क” वर्गीय नगरपरिषद असून नगरपरिषदेची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार२३४५१ एवढी आहे. सद्यस्थितीत शहरात सांडपाण्यासाठी शोष खड्डे व सेप्टीक टॅंकचा वापर होतो. परंतु संबंधित व्यवस्थाही पुरेशी नाही. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी गटारातून व नाल्यातून वाहते, बऱ्याच नगरपरिषदांमध्ये भूमिगत गटार योजना हाती घेण्यात आलेले आहे. परंतु भूमिगत गटार योजनेसाठी येणारा प्रचंड खर्च तसेच या योजनेचा परिचलन व परिक्षणाचा खर्च विचारात घेता या योजना क वर्ग नगरपरिषदना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. अशा योजना योग्य प्रकारे चालविण्यासाठी नगरपरिषदेला नागरिकावर कर रूपाने बोजा टाकावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून सावंतवाडी नगर परिषदेने कमी खर्चाची व कमी परीक्षण खर्च असणारी ही केंद्रीय पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण करण्याची योजना राबविण्याचे ठरवले आहे. सन्मान योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. पहिले टप्प्यांमध्ये मध्यवर्ती व दाट लोकवस्ती या भागात एसटीपी बसवून मलनिस्सारण योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात चा खर्च रक्कम रुपये 150 लाख एवढा आहे तरी विकेंद्रित पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण करण्याची योजना राबवण्यासाठी हे अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा