You are currently viewing माणगाव मळावाडी चोरीतील आरोपी जेरबंद

माणगाव मळावाडी चोरीतील आरोपी जेरबंद

– पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे

सिंधुदुर्गनगरी

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणगाव मळावाडी येथे दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरीतील आरोपी संदीप उर्फ बंड्या दाजी गुंजाळ याला सावंतवाडी येथे जेरबंद केले  असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, सुनिल धनावडे यांनी दिली.

          माणगाव मळावाडी येथे दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांच्या घरी घरफोडी व चोरी करुन सोने व रोख रक्कम असा 1 लाख 27 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीतील आरोपी सावंतवाडी येथे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली होती. त्यानुसार दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपीने चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

 जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, प्रकाश कदम, रवी इंगळे, रमेश पालकर हे    या कारवाई मध्ये सहभागी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा