You are currently viewing अतिवष्टीमुळे मालवण धुरीवाड्यात झाड कोसळुन एक दुचाकी चालक जखमी

अतिवष्टीमुळे मालवण धुरीवाड्यात झाड कोसळुन एक दुचाकी चालक जखमी

अतिवष्टीमुळे मालवण धुरीवाड्यात झाड कोसळुन एक दुचाकी चालक जखमी

मालवण

शहर परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. शहरातील धुरीवाडा येथे मुख्य रस्त्यावर भलेमोठे आंब्याचे झाड कोसळले. यामुळे वीज खांब, वीज वाहिन्या तुटल्या. त्यामुळे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान झाड कोसळले त्यावेळी या मार्गांवरून जाणारा एक दुचाकी चालक जखमी झाला आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
धुरीवाडा काजू कारखाना पुढे काही अंतरावर हे झाड कोसळले. त्यामुळे कोळंब सागरी महामार्ग तिठा येथे बॅरीकेट घालून रस्ता बंद करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा