डी. एड. बेरोजगारांचे आंदोलन तूर्तास स्थगित..
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डीएड पदवीधारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार उमेदवारांनी सुरू केलेले आंदोलन जिल्हा नियोजन समिती सदस्य काका कुडाळकर, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख व अन्य पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर १५ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांच्याशीही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यांनीही डी. एड. बेरोजगारांना आश्वासित केल्याने या मागणीवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. दरम्यान स्थगित करण्यात आलेले आंदोलन मंगळवार १६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर केले जाणार असल्याचे विजय फाले यांनी सांगितले.