You are currently viewing मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती

महिला व बाल विकास विभागाचा नवा शासन‍ निर्णय

सिंधुदुर्ग

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी व सुलभतेने अंमलबजावणी होण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने आज नवा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. गावपातळीवर ग्रामसेवककृषी सहाय्यकतलाठीअंगणवाडी सेविकाआशा सेविकाग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याशिवाय परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेलतर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावेअसे यात म्हटले आहे.

              सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या स्वाक्षरी प्रसिध्द झालेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे- कुटुंबाची व्याख्या- योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पुढीलप्रमाणे राहील. कुटुंब याचा अर्थ पतीपत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य,

                  या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. या योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका /अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविकासेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र/राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (उदा. PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतीलत्यांचा DATA माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व Aadhaar Authentication यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्याना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्रहे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा.

               गावपातळीवर ग्रामसेवककृषी सहायकतलाठीअंगणवाडी सेविकाआशा सेविकाग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करुन त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप/पोर्टलवर भरण्यात यावेत.

               ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात यावी. प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच व्दिरुक्ती (Duplication) टाळण्यात यावी. शासन निर्णय दि.०५.०७.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ+ व  वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्यानेया महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती” ऐवजी “वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आता अ+ व  वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी.

तालुका/ वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करुन लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे.

                नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविकासेतू सुविधा केंद्रआंगणवाडी पर्यवेक्षिकाग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावरएकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन ॲप / पोर्टलवर प्रती यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु. ५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.

          हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७१२१४०१५९४२३० असा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा