You are currently viewing माझे माय बाप

माझे माय बाप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

🚩 *माझे माय बाप*🚩

**************

 

विठू रखुमाई । माझे माय बाप।

साही माझा ताप। वेळोवेळा।।१।।

 

जन्मताच माझ्या। समोर अंधार।

झाले ते आधार। मायेपोटी।।२।।

 

मार्ग सुकर मी। शोधायासी जावे।

प्रश्न ते पडावे। कैकवेळा।।३।।

 

विवंचना माझी। ओळखून सारी।

त्वरेने निवारी। लडीवाळे।।४।।

 

विठू रखुमाई। करती कल्याण।

सांगून पुराण। जगण्याचे।।५।।

 

माझे माय बाप। हृदयी बैसले।

घोर ते संपले। सारे आता।।६।।

 

तयांच्या प्रसादे। मिळे सर्व काही।

उणे काही नाही। जीवा माझ्या।।७।।

 

******************************

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा.

 

🚩🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा