मळगाव येथे तब्बल ५६ लाखाची दारू जप्त, रायगडातील एक ताब्यात…
इन्सुली एक्साईजची कारवाई; चौदा चाकी कंटेनर मधून सूरू होती वाहतूक…
बांदा
चक्क १४ चाकी कंटेनर मधून ५६ लाखाची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रायगड येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मळगाव पुलाजवळ झाराप-पत्रादेवी महामार्गावर करण्यात आली. कृष्णा दिलीप गर्जे (वय २६, रा. कळंबोली-रायगड) असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेवून आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणी ३० लाखाच्या गाडीसह ८६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी निरिक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरिक्षक तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरिक्षक गोपाळ राणे, जवान दिपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजित शिंदे आदींच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबत अधिक तपास रासकर करीत आहेत.