You are currently viewing बांदा-सटमटवाडीतील प्रस्तावित बोगदा व सेवा रस्ता मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेऊ – बाबा काणेकर

बांदा-सटमटवाडीतील प्रस्तावित बोगदा व सेवा रस्ता मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेऊ – बाबा काणेकर

बांदा-सटमटवाडीतील प्रस्तावित बोगदा व सेवा रस्ता मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेऊ – बाबा काणेकर

भाजप सटमटवाडी ग्रामस्थ्यांसोबत असल्याचा शब्द….

बांदा

मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे प्रस्तावित असलेला बोगदा व सेवा रस्ता हा शासनाने नेमून दिलेल्या मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेण्यात येईल यासाठी भाजप सटमटवाडी ग्रामस्थ्यांसोबतच असल्याचे प्रतिपादन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, काल बांदा ग्रामपंचायत मध्ये सटमटवाडी ग्रामस्थांची विशेष सभा संपन्न झाली. या सभेत बोगद्याचा मुळ आराखडा बदलल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत ग्रामपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विशेष सभा ही वादळी ठरली होती. या पार्श्वभूमीवर श्री. काणेकर यांनी बांदा भाजपा ही पूर्णपणे सटमटवाडी ग्रामस्थ यांच्यासोबत असून बोगद्याचे व सेवा रस्त्याचे काम हे मुळ आराखड्यानुसारच करण्यासाठी आपल्यासोबत असल्याचे त्यांनी संगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा