*आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी*
मालवण :
मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवर दिनांक ११ मे २०२४ रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा-बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी या ठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेले शालेय विद्यार्थी कु. वरद गणेश सापळे, कु. समर्थ केदार गावकर, कु. सुरेंद्र केदार गावकर, आणि कु. हर्ष शिवाजी कुबल यांनी समुद्रामध्ये झोकून देऊन समुद्रात बुडणाऱ्या त्या व्यक्तीचे प्राण वाचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी केलेल्या अतुलनीय धाडसामुळे त्यांना ‘शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याकरिता राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली आहे.