You are currently viewing आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे : मा. अरूण देशपांडे

आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे : मा. अरूण देशपांडे

ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला

 

*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- मा. अरूण देशपांडे*

 

पुण्यात मी बदलून आल्यानंतर कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन सारख्या कार्यक्रमांना हजेरी लावत होतो. स्काऊट ग्राऊंड च्या सभागृहात मी मा. अरूण देशपांडे यांना पाहिले. शांत, सौम्य, स्मित हास्य असल्याने लक्ष वेधून घेतले.

आम्ही दोघे बँकेत असल्याने आमचे मैत्र जुळले.

आमची ओळख झाल्यावर माझ्या आणि मिसेस च्या पुस्तकांचे त्यांनी छान परीक्षण केले. मूळचे परभणी चे असले तरी ते बावधन येथे स्थायिक झाले आहेत.

मा.अरूण देशपांडे हे लेखक,कवी,बालसाहित्यिक, समीक्षक असून त्यांनी लेखनास आरंभ- 1983-84 मध्ये केला. तर इंटरनेटवर लेखन-आरंभ-  2011 मध्ये केला.

त्यांची एकूण प्रकाशित पुस्तके – 77, मोठ्यांसाठी – 43, बालसाहित्य – 34, प्रिंट बुक्स – 43, ई बुक्स – 34 मोठ्यांसाठी — प्रिंट – पुस्तके -21, ई बुक्स – 22 = 43 बालसाहित्य – प्रिंट बुक्स – 25, ई – बुक्स – 09 = 34

आजवर प्रकाशित त्यांची काही पुस्तके-हे मनाचे खेळ सारे – ललित लेख, एका पेक्षा एक , नवा आरंभ- (बाल कथा),माझ्या काही अलक (ई बुक), माझे आबा आजी (बालकविता), पावसाचे गाणे (बालकविता), तर हिंदी मध्ये मेरी कविता ..थोडे ख्याल..थोडे सपने, जीवन सरिता मेरी कविता ने रसिकांना वेड लावले.

सामाजिक कार्याची आवड निर्माण करणाऱ्या शाळेची, शाळेतील मित्रांची, आणि गुरुजनांची त्यांना आठवण नेहमीच होते. “कोणतेही काम छोटे नसते, मोठ्या मनाने लोकांच्या मदतीस तत्पर राहिले पाहिजे, लोकसेवा हीच सक्रिय समाज सेवा असते ” हे संस्कार करणारे कार्यकर्ते त्यांना नेहमीच मोठे समाज शिक्षक वाटतात. या सर्वांच्या सोबती ने जमेल तिथे, जमेल तेव्हा “सोशल कार्यात” त्यांचा “खारीचा वाटा” सहभाग असायचा.

शाळेच्या क्रीडा- स्पर्धेत स्वयंसेवक, गावातील उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम ” यात “स्टेज तयारीपासून, ते हॉल रिकामा झाल्यावर “सतरंज्या उचलणाऱ्या” कार्यकर्त्या सोबत काम करणे त्यांना नेहमी आवडले.

पुढे- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या बँकेतील नोकरीत (१९७३ ते २००६) असेपर्यंत बँकेतर्फे राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल ग्रामीण भागात त्यांना “जन जागृती “कार्य करण्यास मिळाले.

यात बँकांच्या बचतयोजना, कर्ज योजना, “इतर कार्य याबद्दल, बचत मेळावे, कर्ज मेळावे” यासाठी लेखन केले, भाषणे केली.

बँकेचे हे कार्य करताना, खेडेगावातील छोट्या शाळेत जाऊन मुलांना गोष्टी – कविता सांगणे या स्वरूपातले सेवा कार्य केले याचा त्यांना आनंद वाटतो.

कृषी विकास शाखेत येणाऱ्या ग्रामीण ग्राहकांना त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत बोलतांना त्यांना वेगळाच आनंद मिळाला.

मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी या संस्थेचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून त्यांना दीर्घ काळ “साहित्य सेवा” करण्याचा योग आला.

वाचन संस्कार, वाचन चळवळ प्रचार आणि प्रसार यासाठी परभणी जिल्ह्यात मसाप परभणी आयोजित साने गुरुजी जयंती निमित्त जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातून लेखन स्पर्धा, वाचन स्पर्धा आयोजित केल्या, हा उपक्रम पाच वर्षे राबवला.

या उपक्रमात त्यांनी बँकेला सहभागी करून घेतले. या उपक्रमातील पारितोषके बँकेच्या वतीने त्या गावी असलेल्या बँकेच्या ब्रँच मॅनेजर यांचे हस्ते वितरित केली. या सामाजिक कार्याची त्यावेळी खूप प्रशंसा झाली.

1990 ते 2005 या काळात परभणीला संपन्न झालेल्या सर्वच साहित्य सम्मेलनात कार्यकर्ता म्हणून त्यांना साहित्य सेवा कार्य करता आले.

निवृत्त सनदी अधिकारी, बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,प्रसिद्ध साहित्यिक व मित्र श्री. लक्ष्मीकांत देशमुख साहेब, हे 90 च्या दशकात “निवासी उपजिल्हाधिकारी” म्हणून परभणीला कार्यरत होते. त्यांनी “परभणी जिल्हा साक्षरता समिती” गठीत केली. यात त्यांनी लेखक, पत्रकार, शिक्षक, आणि त्यांच्यासारखे बँकेतील साहित्यिक यांचा या समितीत समावेश केला.

देशमुख साहेबांमुळे “साक्षरता अभियान” या राष्ट्रीय स्वरूपाच्या सामाजिक कार्यात त्यांना थोडेफार काम करता आले याचा आनंद वाटतो. या अभियानात “नवसाक्षरांसाठी चार पुस्तकांचे” लेखन करण्याची संधी त्यांना मिळाली.

प्रबोधनपर, संस्कारक्षम असे लेखन मग ते बालसाहित्य लेखन असो, वा मोठ्यांसाठी असो, हे लेखन म्हणजे सामाजिक कार्य आहे. आणि गेली चाळीस वर्षे ते हे कार्य सातत्याने करत आहेत.

त्यांना मिळालेले काही उल्लेखनीय बहुमान याप्रमाणे : ऑगस्ट – 2023- अंबरनाथ – जि. ठाणे.

लेखन आणि मी साहित्य समूह – प्रथम वर्धापन दिन समारंभ-व प्रकाशन सोहळ्याचे ते अध्यक्ष होते.

2023 मध्ये – पुण्यात संपन्न झालेल्या दुसऱ्या “प्रतिभा आणि प्रतिमा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष “, वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य-यांच्या” वाचन यात्री पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळा – समारंभाचे ते अध्यक्ष होते.

त्यांना मिळालेले काही उल्लेखनीय पुरस्कार असे:

2008-09- महाराष्ट्र शासनाचा “बाल साहित्य समीक्षेचा – दि.के.बेडेकर “पुरस्कार “बालसाहित्य मराठवाड्याचे – नवे स्वरूप-नव्या वाटा ” या ग्रंथास प्राप्त स्टोरी मिरर “या ई साहित्य संस्थेचाauthor of the year-2018- पुरस्कार,मातृभारती मराठी चा 2019 चा लेखनविषयक विशेष उपलब्धी गौरव पुरस्कार.

त्यांना प्राप्त काही पुरस्कार :

साहित्य सेवा प्रज्ञा मंच – समूह यांचा

साहित्य सेवा सन्मान – २०२३ ,

“माझे आबा आजी “,बालकविता संग्रहास

the international achivers award 2023′

“active best writer -poet in

literature field.

gyan uday foundation-

kota -rajasthan.

socially point foundation (regd.) indore- madhya pradesh.

national pride award -2023

लेखन योगदानसाठी “तितिक्षा इंटरनॅशनल पुणे- यांचा तितिक्षा साहित्य जीवन गौरव पुरस्कार-२०२३,

साहित्य क्षेत्रात- 1983 -2023- या 40 वर्षांच्या लेखन सक्रियतेबद्दल कलाकुंज संस्था -नाशिक

यांचा- कलाकुंज साहित्य भूषणपुरस्कार-२०२३ प्राप्त.

वसुनंदिनी फाऊंडेशन-जामनेर-जळगाव या संस्थेचा

वसुनंदिनी साहित्य रत्न पुरस्कार-२०२३,

समृद्धी प्रकाशन संस्था-हिंगोली यांचा “संत नामदेव राष्ट्रीय ललित साहित्य पुरस्कार -२०२३,” हे मनाचे खेळ सारे ” या ललित लेख संग्रहास मिळाले.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा