सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आव्हानाला सौ.अपर्णा प्रशांत कोठावळे यांचा कौतुकास्पद प्रतिसाद.
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सिटीस्कॅन विभागा ठिकाणी पेशंटची वाढत चाललेली गर्दी पाहता पेशंटला बसण्यासाठी टेबल व खुर्च्या अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे वृद्ध व इतर पेशंटांना त्या ठिकाणी तासोन तास उभ राहावं लागत होते हे पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दानशूरांनी हॉस्पिटलसाठी खुर्च्या द्यावेत असे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला सौ. अपर्णा प्रशांत कोठावळे यांनी योग्य प्रतिसाद देऊन आज दिनांक 12/7/24 रोजी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हॉस्पिटलला स्वखर्चाने 12 खुर्च्या दान केल्या.
सदर कार्यक्रमा दरम्यान एका गरीब महिला पेशंटला डॉक्टरांनी 1600 चे इंजेक्शन लिहून दिलं असता त्या पेशंट जवळ तेवढे पैसे नव्हते हे जेव्हा अपर्णा कोठावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिला पेशंटला 1600 रुपये इंजेक्शन साठी देऊन त्यांना मोठे सहकार्य केले असता त्या पेशंटने त्यांचे खूप आभार मानले.
सामाजिक बांधिलकीच्या आव्हानाला व प्रामाणिक सेवाभावी कार्याला दानशूरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे दानशूरांचे मनःपूर्वक आभार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष श्री बागवे सर यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकरर्ती अपर्णा कोठावळे, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, डॉ.गिरीश चौगुले, डॉ.प्रवीण देसाई, डॉ. आकाश मंगलगी डॉ. ईश्वर पटणे, तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सचिव समीरा खलील, रवी जाधव ,रूपा मुद्राळे व शैलेश गावडे उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*