You are currently viewing आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

मालवण :

 

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात भ. ता. चव्हाण हायस्कूल चौके, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग, हिराबाई वरसकर हायस्कूल व मालवण धूरीवाडा जिल्हा परिषद शाळा मध्ये हा वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने गेली १५ वर्षे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, तालुका समन्वयक मंदार ओरसकर,शहरप्रमुख बाबी जोगी महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत दर्शना कासवकर,आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

चौके हायस्कूल मालवण येथे संस्था अध्यक्ष बिजेंद्र गावडे, राजेश परब, मुख्याध्यापक रसिका गोसावी मॅडम, मंदार गावडे, आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

देवबाग हायस्कूल येथे विभागप्रमुख प्रमुख प्रवीण लुडबे, नगरसेविका सेजल परब, युवतीसेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, सिद्धेश मांजरेकर, अनिल केळुसकर, रमेश कद्रेकर, मुख्याध्यापक सौ. रचना खोबरेकर, परेश सादये, पंकज सामंत, निलेश सामंत आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

मालवण शहरातील धुरीवाडा शाळा मध्ये महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, बाळू परुळेकर, साई वाघ, गणपत आडीवरेकर, अक्षय भोसले आदिसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

वराड येथे हिराबाई वरसकर हायस्कूल मध्ये उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पूनम चव्हाण, दिपा शिंदे, आपा परुळेकर, उपविभागप्रमुख शिशुपाल राणे, मुख्याध्यापक सौ. पी. व्ही.मयेकर, सहाय्यक शिक्षक एस. डी. मुळीक,एम.आर. परब, एस. आर. गोसावी, आर. एस. अहिरे, एस.के.परब, के. ए. मयेकर आदी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा