*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी श्री पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम अभंग रचना*
*== पंढरीच्या वाटे ==*
पंढरीच्या वाटे! जरी मोडे काटे!
दुःख नाही वाटे! पांडुरंगा !!1!!
पंढरीच्या वाटे! जरी झाला त्रास!
तरी होतो भास! विठ्ठलाचा !!2!!
पंढरीच्या वाटे! आनंद तरंग!
बोलतो अभंग! पांडुरंगा !!3!!
पंढरीच्या वाटे ! भेटे वारकारी!
सत्वाहुनी भारी! पांडुरंगा !!4!!
पंढरीच्या वाटे ! हरीचे कीर्तन!
मनाचे मंथन ! पांडुरंगा !!5!!
पंढरीच्या वाटे! मोक्षाचे डोहाळे!
भक्ती उचबळे! पांडुरंगा !!6!!
पंढरीच्या वाटे ! मन स्थिरावते!
अभंगात न्हाते ! पांडुरंगा !!7!!
*…….. पांडुरंग कुलकर्णी*