*शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपाचे ध्येय!*
*सिंधुदुर्गचे भूमीपुत्र भाजपा नेते खा.नारायणराव राणे आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवा सिंधुदुर्ग घडवूया – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे मळगाव येथे आवाहन*
भारतीय जनता पार्टी हा कोकणातील जनतेच्या सर्वांगिण विकासाशी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आदी सर्वांसाठी विविध योजनांमधून सक्षम बनवले जावे यासाठी कोकणचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री रविंद्रजी चव्हाण, तसेच केंद्रीय नेतृत्व खासदार नारायणराव राणे मागील काही वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोकणी जनतेनेही भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे. या जनतेप्रती असणारी कृतज्ञता म्हणून पालकांवर असणारा ताण कमी करत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम मा. रविंद्रजी चव्हाण आणि नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम शाळा-शाळांवर घेतला जात आहे.
आज मळगाव इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे युवा नेतृत्व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्यासमवेत या कार्यक्रमात ॲड.अनिल निरवडेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच स्नेहल जामदार, दिपक जोशी, शक्ती केंद्रप्रमुख श्री. निलकंठ बुगडे, माजी पंचायत समिती सदस्य राजू परब, मुख्याध्यापक मारुती फाले, चेअरमन मनोहर राऊळ, श्री गजा सावंत, शाम सांगेलकर, सिद्धेश राऊळ, सुनील कदम आदी मान्यवर उपस्थित होते.