*जनता संकटात तेव्हा.. शिवसेना मैदानात..!*
*शिवसेनेच्या वतीने आपत्ती ग्रस्तांना आर्थिक मदत*
जनतेवर कोणतेही संकट आले कि शिवसेना पक्ष नेहमीच मदत कार्यासाठी पुढे असतो. मग कोरोनाचा काळ असो, चक्रीवादळांनी घातलेला थैमान असो, अथवा पूरस्थिती असो. नागरिक संकटात असताना शिवसैनिक शांत बसत नाहीत. कोणत्या ना कोणत्या मार्गातून नागरिकांना मदत करण्याचे काम शिवसेना पक्षामार्फत केले जाते. गेले दोन दिवस पूरस्थिती उद्भवून नागरिकांच्या घरात पाणी शिरले असताना सुरुवातीला कोणता पक्ष धावून आला तर तो शिवसेना पक्ष होता.पूरग्रस्तांची प्राथमिक गरज असलेले जेवण, पाणी, ब्लॅंकेट,चादर त्यांना पुरविण्यात आले.त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे घरे कोसळून नुकसान झालेल्या कुडाळ तालुक्यातील कसाल,पांग्रड, पाट येथील नागरिकांना शिवसेनेच्या वतीने आज आर्थिक मदतही करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने *पांग्रड येथे* अमरसेन सावंत,बबन बोभाटे,आनंद मर्गज,मंगेश मर्गज, बाळू पालव, *पाट येथे* अतुल बंगे, महेश वेळकर,अनुप नाईक,उदय मांजरेकर,राजू गवंडे, संदेश सावंत,वैष्णवी शेगले,रामचंद्र तेली,पियुष तेली,गुरु तेली,अक्षय तेली *कसाल येथे* अवधूत मालणकर, बाळा कांदळकर,गणेश मेस्त्री यांनी नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत केली.