You are currently viewing तुळस येथे १३ जुलैला मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर

तुळस येथे १३ जुलैला मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर

*विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, कुंभार टेंब युवक कला क्रीडा तुळस यांचे संयुक्त आयोजन*

वेंगुर्ला :

विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, कुंभार टेंब युवक कला क्रीडा मंडळ तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे *शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत तुळस येथील उत्सव मंगल कार्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.*

सदर शिबिरात मुंबई येथील प्रतिथयश डॉक्टर्स सेवा देणार आहेत.रोग निदान झाल्यावर त्यावर रुग्णांना मोफत औषधे दिली जाणार आहेत.

या मोफत आरोग्य शिबीरात फिजिशियन अँड अन्योलॉजिस्ट एम. डी. डॉ.दिलीप पवार, स्त्री रोग तज्ञ डॉ. रोहन कुलुर, एम.बी.बी.एस.व एम.डी. डॉ.शामला कुलुर, नाक-कान-घसा तज्ञ डॉ.शाम राणे, दंतरोग चिकित्सक डॉ.किशोर धोंड आणि अस्थीरोग तज्ञ डॉ.शरण चव्हाण आदी डॉक्टर सेवा देणार आहेत.

शिबिरात तपासणी करण्यासाठी रुग्णांनी प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३), नितीन चव्हाण ( वजराठ ) , राजबा सावंत ( होडावडा ) , शंकर घारे ( तुळस ) , विजय रेडकर ( तुळस ) , सत्यविजय गावडे ( अणसुर ) , कमलेश गावडे ( पाल ) , ज्ञानेश्वर केळजी ( मातोंड ) ,संतोष गावडे ( पेंडुर ) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करायची आहे.

तरी सदर आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजक संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबिराच्या नियोजनाची सभा तुळस येथील उत्सव मंगल कार्यालय येथे संपन्न झाली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळु देसाई, तालुका प्रमुख सुहास गवडळकर, रवी शिरसाट , पप्पू परब , विजय रेडकर , रामू परब ,वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर , सचिव प्रा.डॉ सचिन परुळकर आणि प्रतिष्ठान चे मंगेश सावंत, सद्गुरु सावंत, सुधीर चुडजी ,महेश राऊळ , नाना राऊळ , प्रदीप परुळकर, गुरुदास तिरोडकर , सागर सावंत, माधव तुळसकर आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा